Marmik
Hingoli live

भरधाव कार शेडमध्ये घुसली! भीषण अपघातात एक जागीच ठार तर एक जण जखमी, सेनगाव नजीक घडली घटना

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर, सतीश खिल्लारी :-

सेनगाव – छत्रपती संभाजी नगर येथून हिंगोली कडे भरधाव जाणारी कार ही सेनगाव लगत असलेल्या एका शेडमध्ये घुसली या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आले आहे.

5 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोली कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ईरटीका कार क्रमांक एम एच 16-एटी 6710 च्या चालकाचे नियंत्रण सुटून कार चक्क शेडमध्ये घुसली. यात शेडमध्ये झोपलेल्या नामदेव हागे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा नातू गोपाल हा गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मयताचा मृतदेह सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. जखमी गोपाल यास उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related posts

बनावट सोने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! बोगस कलेक्टर नंतर महावितरणचा बोगस अधीक्षक अभियंता स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!!

Santosh Awchar

पिंपळदरी शेत शिवारात आढळला गांजा! एक लाख 89 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अधिकारी, अंमलदार यांच्या समस्यांचे केले तात्काळ निरसन; अधिकारी अंमलदार यांच्यातून समाधान

Santosh Awchar

Leave a Comment