मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून दररोज पुष्पहार अर्पण केला जात आहे. तसेच अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे.
आत्माराम गायकवाड (सचिव लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली तथा अध्यक्ष जिथे कमी तिथे आम्ही) यांच्या संकल्पनेतून साहित्यसम्राट डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
दि.7 एप्रिल 2024 पासून सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दररोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. त्या उपक्रमाच्या अनुषंगाने ज्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्यांनी एक झाड लावावे अशी कल्पना आत्माराम गायकवाड यांनी मांडली.
त्या कल्पनेला अनुसरून दिनांक 12 मे 2024 रोजी रवी कांबळे अग्निशामक ड्रायव्हर नगरपरिषद तसेच आकाश सोनटक्के या दोघांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुतळा परिसरात प्रत्येकी एक एक झाड लावून वृक्षारोपणास सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी रवी कांबळे, विजय शिखरे, आकाश सोनटक्के, ब्रह्माजी हनवते, ढोके आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.
रवी कांबळे, विजय शिखरे आणि आकाश सोनटक्के यांचा वाढदिवस असल्यामुळे आत्माराम गायकवाड यांनी त्या तिघांचेही पुष्पहार घालून अभिष्टचिंतन केले आणि वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.