मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती कार्यक्रम घेण्यासाठी टकल मातंग समाजाची 9 एप्रिल रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हिंगोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे हे होते. या बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण नियोजन करून एक समिती गठीत करण्यात आली. समितीचे अध्यक्षस्थानी डॉ. रवी थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी जयंती उत्सव कसा शांततेने साजरा करता येईल. तसेच मातंग समाज आरक्षण अ ब क ड या अनुषंगानेही चर्चा आणि नियोजन करण्यात आले.
मातंग समाज आरक्षण वर्गवारीसाठी मातंग समाज बांधवांच्या लहुजी साळवे कर्मचारी महासंघ हा पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सोनवणे व उपाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी जाहीरपणे सांगितले.
यावेळी प्रेमकुमार सोनवणे, सोपान पाटोळे, दत्तराव गायकवाड, शेषराव चव्हाण, आत्माराम गायकवाड, मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड, व्यवस्थापक संतोष अवचार, बबनराव खंदारे, नामदेव खंदारे, रामचंद्र वैरागड, अनिल खंदारे, दौलत खरात, विशाल खंदारे, सुमित कांबळे, अक्षय डाखोरे, जय घोडे, दिलीप ठोके, संदीप गायकवाड, संदेश शिखरे. रवी शिखरे, विजय सोनवणे, रवी कांबळे, संतोष साबळे, श्रावण मंडलिक, अक्षय कांबळे, संतोष साबळे, द्वारकादास गायकवाड, रामेश्वर सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.