मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,आणि महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम),विभागीय पर्यटन विकास विभाग,छत्रपती संभाजीनगर व वेरूळ-अजंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2024 संयुक्त विद्यमाने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सोनेरी महल परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली विविध वस्तूंचे 30 पेक्षा जास्त भव्य स्टॉल वर प्रदर्शन लावण्यात आले होते.
जिल्हा परिषद अंतर्गत नऊ तालुक्यातील बचत गटांमार्फत एक लाख तेवीस हजार 839 रुपयांची तर मावीम लोकसंचलित साधन केंद्रामार्फत स्थापन करण्यात आलेल्या महिलांच्या बचत गटांच्या प्रदर्शनात विविध वस्तूंची विक्री होऊन दोन लाख 43 हजार 300 रुपयांची भरघोस विक्री या तीन दिवसात झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचे संकल्पनेतून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये महिला स्वयंसहायता समूहामार्फत विविध प्रकारचे उत्पादने तयार केले जातात आणि उत्पादने बाजारपेठेत विकली जातात.त्यातील दर्जेदार उत्पादन स्थानिक बाजारपेठ,तालुका बाजारपेठ व जिल्हा बाजारपेठ तसेच राज्यस्तरावर तसेच बचत गटांच्या वस्तूंना राज्यस्तरावर बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात.
त्याच पार्श्वभूमीवर महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांनी खूप चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करून प्रदर्शनामध्ये ठेवल्या होत्या तर सहभागी झालेल्या प्रेक्षकांनीही केवळ तीन दिवसात प्रचंड प्रतिसाद देत विक्रमी खरेदी केली.
या तीन दिवसीय महोत्सवातील बचत गटांच्या विक्रीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर,जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप मुंडे, जिल्हा व्यवस्थापक सचिन सोनवणे, हरीश पगारे यांच्यासह तालुकास्तरीय तालुका अभियान व्यवस्थापक व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.