मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी शहरात चोरीछुपे पद्धतीने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका व गुटखाजन्य पान मसाला गल्लीबोळात विक्री केला जात असल्याचे चित्र आहे. सदरील प्रकाराकडे कळमनुरी पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. यावर जिल्ह्याचे नूतन कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
हिंगोली चे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेताच जिल्ह्यातील अवैध धंदे चालविणाऱ्या माफिया तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांत मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी आतापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाणे अंमलदार अधिकारी यांना आदेशित करून अवैध धंदे व गुटखा विक्रीवर कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाईकात तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच हप्ते घेणाऱ्या पोलिसांमध्येही कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असे असले तरी कळमनुरी शहरात अवैधरीत्या चोरीछुपया पद्धतीने जागोजागी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, गुटखाजन्य सुगंधित पदार्थ व पान मसाला विक्री होत असल्याचे चित्र आहे. संबंधित प्रकाराकडे कळमनुरी पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. यावर कर्तव्यनिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.