सेनगाव : जगन वाढेकर
सेनगाव तालुक्यात बेकायदेशीररित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. यावेळी टिप्पर सह एकूण 12 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सेनगाव तालुक्यातील हत्ता फाटा परिसरात बेकायदेशीररित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर क्रमांक MH38x2650 हे आढळून आल्याने हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पो. ना. राजू ठाकूर, राजू जाधव, तुषार ठाकरे यांच्या पथकाने सदरील टिप्पर वर कारवाई करत हे टिप्पर जप्त केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने रेती सह 12 लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी नामे दशरथ अंबादास दराडे राहणार साखरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यास ताब्यात घेण्यात आले असून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात भादंवी च्या कलमासह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वय गुन्हा दाखल झाला आहे.