सेनगाव : पांडुरंग कोटकर
तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री कानिफनाथ गड देवस्थान येथे स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग गुजर खुडजकर यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
सेनगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कानिफनाथ गड देवस्थान येथे 26 जून पासून पाच दिवस सकाळी आठ ते दहा या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. स्व. विष्णू गुजर यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याचे कार्य गावातील तरुण मंडळी व त्यांचे कुटुंबीय करत आहेत. यासाठी मेहकर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले यांच्याकडून आर्थिक मदत होत आहे. या पाच दिवसात गडाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून परिसरात लोखंडी अँगल लावण्यात येणार असून काळी माती टाकून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
सदरील परिसर स्वच्छ करण्यासाठी आसाराम महाराज डोंगर, किशन महाराज गिरी, पोस्टमास्तर रामकिसन टाले, शामराव रहाटे यांच्यासह गावातील शिवराणा मित्र मंडळ, महाराणा मित्र मंडळ, विष्णू गुजर, विनोद डोंगर, विशाल रहाटे, कल्याण गुजर, अंकुश गुजर, बबन गुजर, माधव गुजर, बंडू गुजर, बाळू गुजर, संतोष इतकर, ज्ञानेश्वर गुजर, प्रसाद गुजर, रामदेव गुजर, गुजर, दत्तू गुजर, विठ्ठल गुजर, पंढरी गुजर, भगवान चीभडे, सचिन धनगाव, राम गुजर, चैतन्य डोंगर, दत्तू पाटील, भैय्या गुजर व खुडज ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत