मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या हिंगोली येथील संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वच्छता ही सेवा अभियानानिमित्त श्री गणेश मूर्तीच्या निर्माल्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. तसेच 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविला जात आहे. यानिमित्त महाराष्ट्रात शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, जल व्यवस्थापन, स्वच्छता, सांस्कृतिक, आरोग्य, अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या हिंगोली येथील संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने श्रीगणेश मूर्तीच्या निर्माल्याचा निर्णय घेतला आहे.
28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आपल्या लाडक्या बाप्पास निरोप देतात. अनेक भाविक भक्त व नागरिक श्री गणेश मूर्ती नदीत, तलावात विसर्जित करतात. त्यामुळे पर्यावरण आणि पाणी प्रदूषित होते.
त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच नदी आणि नदी काठचा व तलाव, परिसर परिसर स्वच्छ राहावा या हेतूने श्री गणेश मूर्तीचे योग्य विघटन व्हावे यासाठी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने श्रीगणेश मूर्तींच्या निर्मला चा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी त्यांच्याकडील श्रीगणेश मूर्ती हिंगोली शहरातील अग्निशमन दल येथील कुंडात तसेच नगर परिषदेने उभारलेल्या कुंडात टाकावे, असे आवाहन संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हिंगोली नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.