Marmik
News

मुंबईत संततधार ; अनेक सोसायट्यांमध्ये शिरले पाणी, शाळांना सुट्टी!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहेत पडत असलेल्या पावसाने बुधवार रोजी रात्रीला अनेक सोसायटीमध्ये आणि रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाने जरा जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा म्हणून गुरुवार रोजी प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या आणि देशाची इकॉनोमिक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे पावसाची संततधार सुरूच असल्याने सखल भागात पाणी साचले असून रोडवरही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

मुंबईतील डोंबिवली मधील लोढा हेवन निळजमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये तसेच रोडवर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे रोडवर जवळपास गुडघ्याहून अधिक पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून चाकरमान्यांना देण्यात आला आहे.

तसेच खबरदारी म्हणून शहरातील सर्व प्राथमिक शाळांना गुरुवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पडत असलेल्या पावसामुळे तसेच रोडवर आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Related posts

आषाढ वारी: सर्वच बसेस सोडल्या पंढरपूरला, जिल्हांतर्गत व मानवविकासचे झाले तीन तेरा

Santosh Awchar

सिमेंट काँक्रिटचे रस्ते झाले, नाल्या कधी होणार?

Gajanan Jogdand

तोष्णीवाल महाविद्यालयाच्या चौकशीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचा निवेदन

Gajanan Jogdand

Leave a Comment