Marmik
Bhoomika News

एलआयसी व्यवसायातून हिंगोलीचा झेंडा अटकेपार फडकवणारे संतोष आठवले

यशोगाथा – विशेष प्रतिनिधी

मुंबई – व्यवसायाला शिक्षणाचे बंधने नसतात हे हिंगोली येथील संतोष आठवले या युवकाने दाखवून दिले आहे. संतोष यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळात आपल्या व्यवसायाची सुरुवात करून हिंगोलीचा झेंडा पार अटकेपार रोवला आहे. संतोष हे या माध्यमातून दुबई, लंडन, नायजेरिया या देशात आपली सेवा पूर्वत असून आपल्या नावासह हिंगोलीचे नाव लौकिक केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील संतोष आठवले यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. गरिबीमुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. यातून त्यांचे शिक्षणही सुटले नाही. इयत्ता पहिली ते 7 वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद येहळेगाव गवळी येथे त्यांनी पूर्णवेळ केले. त्यानंतर मात्र आर्थिक हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही.

या परिस्थितीमुळे त्यांना आपले गाव सोडावे लागले. 1997 यावर्षी ते मुंबई येथे गेले मुंबई येथे इमारतीच्या बांधकामावर त्यांना काम मिळाले. 1997 ते 2015 या दरम्यान गवंडी { मिस्त्री } म्हणून काम केले. सदरील काम करताना त्यांनी 22 ऑगस्ट 2015 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ या संस्थेत काम सुरू केले.

सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. लोकांशी बोलावे कसे? त्यांच्या अडचणी आदी समजून घेत त्यांनी यावर विजय मिळवला. 2015 ते 2023 या 9 वर्षाच्या प्रवासात त्यांनी 2000 ते 2500 ग्राहकांना सेवा देण्याचे काम ते करत आहेत. त्यांचे ‘एलआयसी होल्डर’ हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारतात गुजरात, आसाम या राज्य मध्येही आहेत.

तसेच भारताबाहेर दुबई, लंडन, नायजेरिया या देशातही त्यांचे ‘एलआयसी होल्डर’ आहेत. त्यांना ते अविरतपणे सेवा पुरवत आहेत तसेच त्यांच्या अडीअडचणी ही समजून घेत आहेत. भारतातील ग्राहकांशी ते सहजपणे हिंदीतून संभाषण करतात.

तसेच विदेशातील ग्राहकांशी ही ते सहज एकरूप होतात. यामध्ये त्यांनी इंग्रजी येत नाही म्हणून कधीच न्यूनगंड बाळगला नाही. उलट मोठ्या आवडीने त्यांनी ही भाषा अवगत करण्याचा प्रयत्न केला आणि तो सार्थकी लावला.

संतोष आठवले हे आपल्या ग्राहकांना फ्री सेवा मृत्यू दावा सेंटलमेंट, पॉलिसी मध्ये नॉमिनी बदलणे, पॉलिसी शाखा बदलणे, पॉलिसीचे प्रीमियम मोड बदलणे, बंद पॉलिसी चालू करणे, पॉलिसी मॅच्युरिटी काढून देणे, नवीन पॉलिसी काढणे आदी सेवा मोफत पुरवतात. व्यवसायिक संतोष आठवले यांनी आपल्या या व्यवसायातून स्वतःची प्रतिमा तर उंचावली.

मात्र हिंगोली जिल्ह्याच्या नावाची पताका देखील अटकेपार लावली आहे. त्यांच्या ग्राहकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. या विश्वासाच्या जोरावरच त्यांनी यशाचे शिखर पदाक्रांत केले आहे.

एलआयसी कडून पारितोषिकांची लयलूट

व्यावसायिक संतोष आठवले हे आपल्या कार्याने भारतीय आयुर्विमा महामंडळास सतत चर्चेत असतात त्यांनी मागील कित्येक वर्षांपासून याची प्रचिती दिली आहे तसेच देत आहेत. महामंडळाच्या ठाणे विभागातून ते प्रत्येक महिन्याला अव्वल येतात त्यामुळे त्यांचा प्रत्येक महिन्याला स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून घेतली पदवी

व्यवसायाला शिक्षणाची अट नसतेच कधी. तसेच इतर बंधनही नसतात; मात्र आताचे तरुण अनेक न्यूनगंड बाळगून ‘स्टार्टअप’ करत नाहीत. त्यामुळे हे तरुण बेरोजगारीचा सामना करतात. व्यावसायिक संतोष आठवले यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळात आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यांचे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण येळेगाव गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत नियमित झाले. त्यानंतर मात्र शिक्षणात दहा वर्षाचा खंड पडला. त्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरून शांताबाई दराडे /भारती विद्या मंदिर हिंगोली तेथे १० वी काढली आणि येळेगाव गवळी येथील गोकुळ विद्यालयात इयत्ता११ वी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे B.A. ची डिग्री पुर्ण केली तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता कोणताही व्यवसाय सुरू करावा. व्यवसाय मोठाच सुरू करावा, असे काही नसते. अगदी छोट्या पासून सुरुवात करावी. म्हणजे सुरुवातीला व्यवसायातील धक्केही छोटेच मिळतील. हे छोटे धक्के नंतर आयुष्यात मोठे होण्यासाठी मार्ग दाखवतात असे ते सांगतात.

Related posts

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा: अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तरप्रख्यात गायक सुदेश भोसले यांचा कंठसंगीतासाठी सन्मान, रोहिणी हट्टंगडी यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

Gajanan Jogdand

अंतरवाली सराटी लाठी चार्ज प्रकरण: सेनगाव बंद, तर मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक, काही संघटनांचे पदाधिकारी नजर कैदेत

Gajanan Jogdand

Hingoli समगा येथील कयाधू नदीवरील पूल पाण्याखाली, दहा गावांचा संपर्क तुटला

Santosh Awchar

Leave a Comment