Marmik
Hingoli live

सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हिंगोली जिल्हयातुन हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना वर्षभरासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्हायातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्यावरुन पो.स्टे. हिंगोली शहर, बासंबा व वसमत ग्रामीण यांनी सराईत गुन्हेगारी करणारे इसम नामे सय्यद बिलाल सय्यद मुनवर (रा. पेन्शनपुरा हिंगोली), राधेश्याम विठ्ठल हरण (रा. सावरखेडा ता. हिंगोली), बाबासाहेब संभाजी खरे (रा. थोरावा ता.वसमत जि.हिंगोली) यांच्या विरुध्द मपोका कलम ५६ (१) (ब) प्रमाणे तडीपार प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केले.

सदरचे प्रस्तावची उपविभागीय उपविभाग कार्यालय, हिंगोली शहर व वसमत यांच्या कडुन पुर्ण चौकशी करुन अंतिम आदेश करीता उपविभागीय अधिकारी हिंगोली व वसमत यांचे कार्यालयात दाखल केले असता उपविभागीय अधिकारी हिंगोली व वसमत यांनी अ.क्र. १ ते २ याना दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी आ.क्र.३ यास दि. ३० जून २०२२ रोजी नमुद सराईत गुन्हेगारांना हिंगोली जिल्हयातुन एक वर्षा करीता हद्दपार आदेश पारीत केला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांनी सदर प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगोली व वसमत येथे अहवाल सादर केले.

सदर प्रस्तावाची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार यांनी वेळोवेळी सदर प्रस्तावा बाबत पाठपुरावा करून हृददपार कार्यवाही मध्ये मदत केली.

Related posts

मोबाईल टॉवरच्या तांब्याचे केबल व सोलार पॅनल चोरणारे दोघे गजाआड; 12 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

हिंगोली पंचायत समितीत कागदाचा तुटवडा! नागरिकांना कोरे कागद मिळेनात

Gajanan Jogdand

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तिघांवर कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment