मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :‐
हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी सतत उल्लेखनीय कामगिरी करावी म्हणून प्रत्येक महिन्यात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरी नुसार विविध विभागातून उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात येत आहे. माहे डिसेंबर 2023 मध्ये विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदार यांची निवड करण्यात आली आहे.
गुन्हे निर्गती – यामध्ये पोलीस स्टेशन कुरुंदा यांनी माहे डिसेंबर 2023 मध्ये गुन्हे निर्गती केली ज्याची टक्केवारी 78% आहे. गुन्हे निर्गती विभागात कुरुंदा पोलीस ठाणे यांनी नमूद महिन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे गुन्हे निर्गती या विभागात कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व पोलीस अंमलदार बालाजी जोगदंड शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
मुद्देमाल निर्गती – यात कळमनुरी पोलीस ठाणे यांनी माहे डिसेंबर 2023 मध्ये पोलीस ठाण्याला विविध गुन्ह्यात जप्त मुद्देमाला पैकी 20% मुद्देमालनिर्गती केली. नमूद महिन्यात मुद्देमाल निर्गती या विभागात कळमनुरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे व पोलीस अंमलदार टीकाराम राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
अपराध सिद्धी – यात औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांनी माहे डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या पोलीस ठाणे अंतर्गत न्यायालयातून निकाल लागलेल्या सर्व प्रकारात शिक्षा झाली आहे. अपराध शिक्षेचे प्रमाण 92 टक्के आहे. त्यामुळे नमूद महिन्यात अपराध सिद्धी या विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे व पोलीस अंमलदार गजानन गडदे यांची निवड करण्यात आली आहे.
सीसीटीएनएस डाटा एन्ट्री – यामध्ये हिंगोली शहर पोलीस ठाणे यांनी माहे डिसेंबर 2023 मध्ये सीसीटीएनएस मध्ये डाटा एन्ट्री प्रकारात गुन्ह्यातील कागदपत्र जलद गतीने व यशस्वीरित्या भरले त्याचे प्रमाण 76 टक्के आहे. त्यामुळे नमूद महिन्यात सीसीटीएनएस डाटा एन्ट्री या विभागात हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस अंमलदार केशव पुंड, अनिल बुद्रुक यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतिबंधक कार्यवाही – यात गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून कुरुंदा पोलीस ठाणे यांनी माहे डिसेंबर 2023 मध्ये 42 प्रतिबंधक कार्यवाही केली. नमूद महिन्यात प्रतिबंधक कार्यवाही या विभागात कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांची निवड करण्यात आली आहे.
समन्स वॉरंट बजावणी – यात नरसी नामदेव पोलीस ठाणे यांनी माहे डिसेंबर 2023 मध्ये समन्स वॉरंट बजावणी यात अजामीनपात्र वॉरंट बजावणी शंभर टक्के, जामीनपात्र वॉरंट बजावणी 100% समन्स 100% बजावणी केली. त्यामुळे नमूद महिन्यात समन्स वॉरंट बजावणी या विभागात नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे व पोलीस अंमलदार प्रवीण शिरफुले यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रमाणे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलात विविध विभागात उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांची विभागनिहाय निवड करण्यात आली असून त्यांच्या छायाचित्र असलेले बॅनर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.