मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तामिळनाडू येथे 31 जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियन साठी क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया विदर्भ यांच्याकडून हिंगोली येथील प्रणव सुधीर शिंदे या क्रिकेटरची निवड झाली आहे.
31 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान तामिळनाडू राज्यातील अमीर महाल क्रिकेट मैदान आणि विवेकानंद महाविद्यालयाचे मैदान या ठिकाणी राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियन आयोजित करण्यात आली आहे.
या चॅम्पियन साठी 17 वर्ष वयोगटाखाली हिंगोली येथील प्रणव सुधीर शिंदे या क्रिकेटरची निवड करण्यात आली आहे.
या चॅम्पियन मध्ये मलेशिया युएई, कर्नाटक, हैदराबाद, पुणे, चेन्नई, सी एफ आय – आय एक्स, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, बंगळुरू आणि विदर्भ हे संघ सहभागी होणार आहेत.
प्रणव शिंदे यांच्या निवडी बद्दल त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.