मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यातील शिक्षणाची दयनीय अवस्था, तसेच भ्रष्टाचार आणि आरटीई कायद्याची होत असलेली पायमल्ली या सर्वांच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी शिक्षण आयुक्त पुणे यांच्या दालनात सामूहिक आत्मदहन करण्यात येणार होते. मात्र 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने सदरील आत्मदहन आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शिक्षणाची दयनीय अवस्था झाली असून आरटीई कायद्याची पायमल्ली होत आहे. तसेच अनियमित कामे भ्रष्टाचार वाढला असून या सर्वांच्या निषेधार्थ विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी शिक्षण आयुक्त पुणे यांच्या यांच्यासमक्ष त्यांच्या दालनात सामूहिक आत्मदहन करण्यात येणार होते.
या अनुषंगाने उपसंचालक शिक्षण औरंगाबाद यांनी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांना पत्र देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले तसेच आत्मदहन आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली. भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याने विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलनास 18 ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
दोषी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्याशी संगनमत करणारे तत्कालीन व विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांच्यासह तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच इतरांवर कार्यवाही करत निलंबित करून विभागीय चौकशी करावी आणि त्यांच्यावर भादवि अन्वय गुन्हा दाखल करावा.
तसेच त्यांची चलचल संपत्तीची चौकशी करावी अशी मागणीही विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी केली असल्याचे या एनजीओचे राष्ट्रीय संचालक शेख नोमान नवेद नईम यांनी कळविले आहे.