मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरालगत असलेल्या लिंबाळा मुक्ता एमआयडीसीतील गजानन गंगामाई कंपनीतून सर्विस केबल चोरी करणाऱ्या एकास हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे. या आरोपीकडून 48 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील लिंबाळा मक्ता एमआयडीसीतील गजानन गंगामाई कंपनीतून 40 हजाराचा सर्विस केबल चोरी गेल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
या तक्रारीवरून 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास सूचना दिल्या होत्या.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सदर चोरीचा समांतर तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून लिंबाळा मक्ता येतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार करण जिलान्या पवार, लखन किसन काळे, परशुराम उर्फ काल्या दीपक चव्हाण (रा. लिंबाळा मक्ता) यांनी एमआयडीसीतील गजानन गंगामाई कंपनीतील केबल चोरी व 20 दिवसापूर्वी औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची माहिती मिळाली.
तसेच चोरलेला केबल हा एमआयडीसी भागातच लपवून ठेवला आहे व घरफोडीतील मुद्देमाल सुद्धा आरोपीच्या घरी आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन तीन आरोपींपैकी एक आरोपी लखन किसन काळे यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
तसेच त्याच्याकडून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे व औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतील चोरी व घरफोडी असे दोन गुन्हे उघड करून रोख रक्कम, केबल व गोडे तेलाची कॅन असा ऐकून 48 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आलेली आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस आमदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, हरिभाऊ गुंजकर व तुषार ठाकरे यांनी केली.