मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक सलग्नित नवजीवन चॅरिटेबल ट्रस्ट परभणी द्वारा संचलित शरदचंद्रजी पवार महाविद्यालय संतुक पिंपरी औंढा नागनाथ रोड हिंगोली येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 2023 च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या.
या महाविद्यालयात ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविका बांधकाम पर्यवेक्षक, डी.एम.एल. टी. आदी व्यवसायिक शिक्षण दिले जाते.
यासाठी विद्यार्थ्यांनी आपला व्यवसाय नोकरी करून शिक्षण घेण्याची एक सुवर्णसंधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.
सदरील परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर डोर्नलपल्ले, केंद्र संयोजक प्राध्यापक पांडुरंग इमडे, केंद्र सहाय्यक विनोद चिवडे, वरिष्ठ पर्यवेक्षक भगवान मस्के, प्राध्यापक काने, प्राध्यापक कुरे, प्राध्यापक काशीदे, प्राध्यापक जुमडे, सुरेश डोर्नलपल्ले आदींनी परिश्रम घेतले.
शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विविध व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी शरद चंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय हिंगोली येथे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर डोर्नलपल्ले यांनी केले आहे.