Marmik
Hingoli live महाराष्ट्र

शेख नईम शेख लाल ‘सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022’ ने सम्मानित

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांना त्यांच्या कार्याबद्दल निर्वाण फाउंडेशन नाशिक द्वारा जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ता शेख लाल यांना सदरील पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांचे जिल्हाधरातून अभिनंदन कौतुक केले जात आहे.
निर्वाण फॉउंडेशन,नाशिक द्वारा आयोजित कार्यक्रमात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (NGO), च्या माध्यमाने सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्या मुळे विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख लाल यांना किटॅनो अर्बीस्ता दज्ता,(सामाजिक कार्यकर्ता,पश्चिम आफ्रिका), ग्रॅबियल लोपेस द सिल्वा,(सामाजिक कार्यकर्ता, पश्चिम आफ्रिका),डॉ. एम. बी. देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी, नाशिक, प्रशांत गरुड,अभिनेता, संस्थेचे अध्यक्ष, सचिव,व इतरांच्या हस्ते “सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022” ने सम्मानित करण्यात आले. सोबत सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र हि देण्यात आले.

या वेळी त्यांच्या सोबत परवेज खान, ऐजास खान,अन्सार खान,एन बी मोरे,उसामा खान हे होते.

शेख नईम शेख लाल यांना सामाजिक क्षेत्रात कार्याबद्दल मिळणारा हा 05 वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे..


पुरस्कार देऊन सम्मानित केल्या बद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करण्यात आले,सामाजिक क्षेत्रात सतत मिळत असलेल्या पुरस्काराचा श्रेय, माझी आई,माझे लहान भाऊ विशेष करून शेख नफिस पहेलवान, मुलगा शेख नौमान नवेद नईम,पुतने शेख अदनान पहेलवान,शेख फैजान,शेख आकिब,विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल चे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार महोदय यांना जाते कारण सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अश्या वेळी सतत माझ्या पाठीशी खंभीर पणे उभे राहून माझे मनोबल वाढविण्याचे काम करत केले आहे हि माझ्या साठी आनंदाची जमेची बाजू आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related posts

जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक: हिंगोली जिल्ह्यासाठी 338.49 कोटी रुपयाच्या निधीची मागणी

Santosh Awchar

हळदीचे भाव रेकॉर्ड ब्रेक! वसमत बाजार समितीत गाठला 30 हजाराचा आकडा !!

Santosh Awchar

शिक्षणाधिकाऱ्यांना विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचा दणका! कारवाई न केल्याने कारणे दाखवा नोटीस

Gajanan Jogdand

Leave a Comment