मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
औंढा नागनाथ ( तालुका प्रतिनिधी) – शिवसेने मध्ये नव्यानेच प्रवेश केलेले माजी जि. प. सदस्य अजित मगर, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख माजी आमदार संतोष टार्फे आदींचा 2 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ येथे सत्कार सोहळा पार पडला. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत गाव तेथे बूथ तयार होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील सत्तापालटेनंतर शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले कळमनुरी विधानसभेचे विद्यमान आमदार संतोष (दादा) बांगर यांना मात देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त केले आहेत.
यामध्ये विनायक भिसे, संदेश देशमुख यांना जिल्हाप्रमुख पद देण्यात आलेले आहे तर माजी आमदार संतोष टार्फे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या नूतन पदाधिकाऱ्यांनी तसेच शिवसेनेत प्रवेश केलेले अजित मगर, संतोष टार्फे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख आदींचा 2 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ येथे प्रथमच सत्कार सोहळा घालण्यात आला. यावेळी औंढा नागनाथ येथील विश्रामगृहावर बैठक घेऊन गाव तेथे बूथ करण्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी. डी. मुळे हे उपस्थित होते. या सत्कार सोहळ्या दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
या सत्कार सोहळ्याला औंढा नागनाथ सह तालुक्यातील सिद्धेश्वर, नंदगाव, वडचुना, गांगलवाडी, शिरड शहापूर, येहळेगाव, अंजन वाडा आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.