मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता शिव अभिषेक व शिवपाळणा गावुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची मिरवणूक ‘जय भवानी जय शिवराया’च्या जयघोषात मिरवणुक काढण्यात आला. यावेळी हिंगोली शहर दुमदुम गेले होते. या मिरवणुकीत महिला लेझीम व फुगड्या शिव महिला प्रेमींनी खेळत नागरिकांची मने जिंकली.
ही मिरवणुक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ढोल ताशाच्या गजरात पायदळी घोड्यासोबत वारकर्यांच्या टाळ, मृदंगाच्या भजनामध्ये निदानात हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय… . एकच राजा जन्मला शिवनेरी गडावर निदानात मिरवणूक निघून त्यानंतर ९ वाजता भव्य मोटारसायकल रॅली १० वाजता रक्तदान शिबीर, १०.३० वाजता शिवशंभो ढोल पथकाचा शुभारंभ व रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा ते जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक या मार्गे शोभा यात्रा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली.
या मिरवणूकीमध्ये शिवज्योत मावळयासह घोडदळ, वारकरी मंडळी, मुख्यरथ, वारकरी महिला, शिवशंभो ढोल पथक, लेझिम पथक, चलचित्र पथक देखावा, बँड पथक, विविध शाळांचे देखावे यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी अन्नदान व ठिकठिकाणी पाण्याची व रसवतीची व्यापारी बांधवांनी व्यवस्था केली होती. या मिरवणुकीमध्ये शाळा, महाविद्यालय, तसेच नर्सी नामदेव येथील देवस्थानच्या वतीने वारकरी महिला लेझिम व वारकरी संप्रदायाचे बालक सहभागी झाले होते.
या मिरवणुकीमध्ये जय भगवान बाबा, मुस्लिम बांधव व मराठा समाजाच्या अनेक नागरिकांनी व व्यापार्यांनी शिवप्रेमीसाठी चहा, पाणी व रसवतीची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी, माता-भगिनी, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ही मिरवणूक निघल्यानंतर विविध भागातुन मिरवणुक ढोल ताशाच्या गजरात निघुन छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यासमोर या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे कुळवाडी भुषण शिवाजी महाराज यांच्या जयघोषात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पार पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विवेकांनद वाखारे,पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, समाज कल्याण अधिकारी सरगर, सुनिल पाटील गोरेगावकर, रणजीत पाटील गोरेगावकर, अॅड, आमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे, अॅड, दिलीप भाकरे, भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर, शिवाजी ढोकर पाटील यांच्यासह हजारो शिवभक्त सहभागी झाले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, माजी खासदार शिवाजी माने, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण , मनोज आखरे , शिवशंकर घुगे, पंकज जाधव, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शिवाजी मेटकर मनीषा आखरे, उल्हास पाटील, कल्याण देशमुख, पप्पू चव्हाण ,पवन पाटील, त्रिंबकराव लोंढे , खंडेराव सरनाईक, कल्याण देशमुख, भूषण देशमुख, डॉ. रमेश शिंदे, डॉ. सतीश शिंदे, डॉ. प्रल्हाद शिंदे, केशव सोनुने, बाबाराव शृंगारे, आनंदा अडकिणे, सरनाईक यांच्यासह कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार संतोष दादा बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हा प्रमुख विनायकराव भिसे पाटील, महिला मडळाच्या सुनिता मुळे, योगीता देशमुख, छाया मगर, वंदना आखरे, माधवीताई पाटील गोरेगावकर, डॉ. राधीकाताई देशमुख, जयाताई मेटकर, अरुणाताई ठाकरे,अर्चना जाधव, निलाताई जगताप, जया पवार, मिनाक्षी जाधव, मुक्ताबाई खरात, सुनिता सवनेकर, रजनीताई पाटील, मयुरी सोनटक्के, शितल शिंदे, सुनिता चव्हाण, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. सुनिता पवार, विद्या पतंगे, आशा बाहेकर, निता सावके, कांताबाई कल्याणकर, अरुणा टाकळगव्हाणकर, मिराताई कदम आदींची उपस्थिती होती.