मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑक्टोबर रोजी ‘1 तारीख एक तास महाश्रमदान’ हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. सदरील उपक्रमात हिंगोली जिल्हा पोलीस दल सहभागी झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.
शासनाकडून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत एक ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘1 तारीख एक तास महाश्रमदान’ हा स्वच्छता उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला.
या उपक्रमात हिंगोली जिल्हा पोलीस दल सहभागी होऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महाश्रमदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.