मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – श्रावण म्हटला की आठवते ती हिरवळ, एक चैतन्य आणि आल्हाददायक महिना. श्रावणात अनेक चांगल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. अशा या श्रावण महिन्यात हिंगोली येथे राज्यस्तरीय श्रावण सरी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कवी संमेलनाच्या माध्यमातून जणू श्रावण शब्दबद्ध होणार आहे.अक्षरोदय साहित्य मंडळ शाखा हिंगोली यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जि. प. बहुविध प्रशाला शिवाजी नगर हिंगोली येथे राज्यस्तरीय श्रावण सरी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते सूर्यवंशी हे उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून मंडळ माजी अध्यक्ष सदानंद सपकाळे यांची उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली येथील प्रसिद्ध साहित्यिक सुधाकर इंगोले, बबन शिंदे परभणी येथील प्रसिद्ध साहित्यिक शंकर कदम, माजी चेअरमन प्रकाश निळकंठे हे उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात शंकर माने, श्रद्धा मोरे, राणी नेमानीवार, राजेंद्र चारोडे, मयुर जोशी, रुचिरा बेटकर, अंबादास घाडगे, ज्योती देशमुख, गणेश आघाव, सुमन लटपटे, प्राध्यापक संजय चव्हाण, कलानंद जाधव, उषाताई ठाकूर, अशोक दिपके, सुनिता घोडके, उद्धव परभणीकर, उमाकांत काळे, कमलाकर दुबे यांच्यासह हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील कवी सहभागी होणार आहेत.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कैलास कावरखे हे करणार असून गजानन बोरकर हे उपस्थितांचे आभार मानणार आहेत. या कवी संमेलनाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक अक्षरोदय साहित्य मंडळ राज्य उपाध्यक्ष सिंधुताई दहिफळे व मंडळाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष कृष्णा वानखेडे यांनी केले आहे.