मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील प्रसिद्ध श्री खंडोबा यात्रा महोत्सव मध्ये 19 जानेवारी रोजी कुस्तीचे जंगी सामने पार पडले. या सामन्यांसाठी हिंगोली जिल्हा सह इतर जिल्ह्यातील अनेक पहेलवानांनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रथम क्रमांक दिगंबर भुतनर (सावंगी), द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर पानबुडे (लोहगाव) तृतीय क्रमांक विजय शिंदे, (वारा), चतुर्थ क्रमांक वाल्मीक डाखोरे (पळसगाव) यांनी अनुक्रमे बक्षीस प्राप्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा चे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, शिवसेना उपप्रमुख परमेश्वर मांडगे, रामप्रसाद बेंगाळ सरपंच कोळसा, माणिकराव कोल्हाळ सरपंच कोंडवाडा, डॉक्टर माधव मस्के रिसोड,अंकुशराव बेंगाळ, यात्रा कमिटी नशीबभाई, वैजनाथ तोंडे, पावडे मामा, कडूजी भगवत, भाऊराव मोरे,भास्कर मोरे,मल्हारी पावडे,बबन पाटील, गंगाराम मोठे, मनु पाटील पुजारी, भिमराव बेंगाळ, मोईन सय्यद, भगवान मुंगसे हे उपस्थित होते.
यावेळी पंच म्हणून प्रकाशराव पाटील, मनोहर बांगर, प्रकाश देशमुख,अक्रमभाई यांनी काम पाहिले यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय,चतुर्थ येणाऱ्या पहेलवानांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन भालचंद्र पहेलवांन यांनी केले. याप्रसंगी यात्रा कमिटी ग्रामपंचायत कोळसा व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.