मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी 26 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे मावळते पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
एन दिवाळीत हिंगोली जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक देण्यात आले. यासाठी आधी हिंगोली येथील राज्य राखीव बलाचे श्री गिल यांची निवड करण्यात आली; मात्र रात्रीतून याबाबतचा निर्णय बदलून हिंगोली जिल्ह्यात श्री. जी. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी 26 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.