मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
ठाणे – अनुसूचित जाती च्या आरक्षण वर्गवारी च्या मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय लहू शक्ती व सकल मातंग समाज यांच्या वतीने 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
भारतीय संविधानातील सामाजिक न्याय समता बंधुता आधारित अनुसूचित जाती आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करावे व होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय नवशक्ती व सकल मातंग समाज यांच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात मोठ्या संख्येने मातंग समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मातंग समाज नवी मुंबई व ठाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.