मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 17 नोव्हेंबर यादरम्यान एकाच वेळी जिल्ह्यातील ४१ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. या विशेष मोहिमेत तिघांवर गुन्हे दाखल झाले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जामीन पात्र 20 वॉरंट सदर मोहिमेत तामिल करण्यात आले.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून अवैध धंदे चालविणाऱ्या बाबत कडक भूमिका घेत तसेच यापूर्वी गंभीर गुन्ह्यातील तसेच चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वसमत तालुक्यातील पळशी येथील राहणारे सराईत गुन्हेगार सुदर्शन मोहन शिंदे (35 वर्ष), योगेश गुलाबसिंग पवार (35 वर्ष), सचिन मोहन शिंदे (वय 30 वर्षे) यांना कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वय दोन वर्षांसाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
तसेच हद्दपारचा आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात वावरणाऱ्या दोन इसमांना पकडून कलम 142 म. पो. का. अनमय कार्यवाही करण्यात आली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दारू, हातभट्टी, जुगार, मटका, अवैध शस्त्र, गांजा व गुटखा बाबत स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस तसेच दहशतवाद विरोधी पथकाने मोठ्या प्रमाणात कार्यवाही करून गुन्हे दाखल व प्रतिबंधित कार्यवाही केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्यान विरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाचे वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 16 नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेपासून 17 नोव्हेंबर रोजी च्या सकाळी 5 वाजे पावे तो संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदर मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनापोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोरोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे व सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.
41 ठिकाणी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांची तपासणी
या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 41 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील वसराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच करार व पाहिजे असलेल्या आरोपींची ही तपासणी करण्यात आली.
शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
या मोहिमेत स्थानिक पुणे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध दोन तर हिंगोली शहर पोलीस ठाणे यांच्याकडून एक असे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वय तीन गुन्हे दाखल करण्यात आले.
पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या दोघांच्या मुस्क्या आवळल्या
सदर मोहिमेत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मागील पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना औंढा नागनाथ पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.जामीन पात्र 20 जणांना वॉरंटसदर मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समाज निघूनही तारखांवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत न्यायालयाकडून अटकवारंट निघाले होते अशा एकूण 25 अटकवारंट मधील इसमांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच जामीनपात्र 20 वॉरंट सदर मोहिमेत तामिल करण्यात आले.
हद्दपारिचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात वावरणाऱ्या दोघांची उचल बांगडी
हद्दपारचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात लिंबाळा मक्ता परिसरात वावरताना मिळून आलेले इसम नामे संजय पाड्या पवार व करण जिल्ह्यान्या पवार यांना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे पथकाने पकडून त्यांच्याविरुद्ध 144 म. पो. का. अन्वय गुन्हे दाखल करण्यात आले.