मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांनी संयुक्त कामगिरी करत एकाच वेळेस विशेष कोंबडी ऑपरेशन यशस्वीपणे राबविले. यामध्ये तडीपारचे आदेश डावलून शस्त्रासह मिळून आलेल्या व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन फरार आरोपींना धारदार शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेत तसेच यापूर्वी गंभीर गुन्ह्यातील त्याचप्रमाणे चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाचे वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 9 जुलै च्या रात्री 11 वाजेपासून 10 जुलै च्या पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक पंडित कचवे, विकास पाटील, तुकाराम आम्ले, वैजनाथ मुंडे, चंद्रशेखर कदम, रणजीत भोईटे, गणेश राहिरे, शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, गजानन बोराटे विलास जवळी गजानन मोरे, रवी हुंडेकर, अरुण नागरे, स्थानिक गुन्हे शाखा शाखा पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने तसेच सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलिस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 49 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत, अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची ही तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत तडीपरीचे आदेश झालेले असताना सदर आदेशाचे उल्लंघन केलेल्या तसेच आदेशाची उल्लंघन करून अवैध शस्त्रासह मिळून आलेल्या व केवळ अवैध शस्त्रासह मिळून आलेल्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेकडून 3, कळमनुरी पोलीस ठाणे यांच्याकडून एक, हिंगोली पोलीस ठाणे यांच्याकडून एक, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडून एक, अशा इस्माविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कळमनुरी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध कलमातील गुन्हेगार तसेच कलम 7 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट सह कलम 3(४) मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे प्रेम सिंग रतन सिंग टाक व भगतसिंग जुगल सिंग टाक दोन्ही ((रा. इंदिरानगर कळमनुरी) हे अवैध शस्त्र बाळगत असताना प्रेमसिंग हा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाणे येथे कलम 4 / 25 भा.ह. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या मोहिमेत सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान संशयितरित्या फिरणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून 2, कळमनुरी पोलीस यांच्याकडून 2, हिंगोली ग्रामीण पोलीस यांच्याकडून एक, औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांच्याकडून एक, हट्टा पोलीस ठाणे यांच्याकडून दोन इसमाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या मोहिमेत हिंगोली शहर पोलीस ठाणे यांच्याकडून गुरनं 613/2023 भादवी 379 मधील आरोपीस अटक करून चोरीस गेलेली मोटरसायकल किंमत अंदाजे 68 हजार रुपयांची जप्त करण्यात आली.
तसेच औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांच्याकडून भादविच्या विविध बोलण्यातील तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करून एकूण 6 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा एकूण 12 अटक वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.