मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार घेतलेल्या नूतन कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी कळमनुरी तालुक्यातून सहा घनमीटर सागवान जप्त केले आहे. तसेच चार रंधा मशीनही जप्त केल्या आहेत. कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी हिंगोलीचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यातील त्यांची ही चौथी कारवाई आहे. त्यांच्या या कारवाईने अवैध वृक्षतोड करणाऱ्या माफियात मोठी खळबळ उडाली आहे.
हिंगोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील नूतन कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सदरील कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे कळमनुरी तालुक्यातील पातोंडा बीट अंतर्गत येणाऱ्या वऱ्हाडी परिसरातून वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी आपल्या पथकासह धाड टाकून सहा घनमीटर सागवान जप्त केला.
तसेच 12 इंच च्या चार रंधा मशीनही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी आरोपी शंकर ठोके सुनील ठोके, नानाराव धुळे या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी किती लोक या प्रकरणात आहेत याची चौकशी केली जात आहे. जप्त केलेले सागवान व रंधा मशीन ह्या हिंगोली विभागीय वन अधिकारी कार्यालयात आणण्यात आले आहेत.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल जी. पी. मिसाळ, वनरक्षक शिंदे, केंदळे, गोखले व वन मजूर यांनी केली.
रात्री दोन वाजेपर्यंत केली पेट्रोलिंग; पहाटे कारवाई
हिंगोली येथील कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून रात्री वाजेपर्यंत पेट्रोलिंग केली. पेट्रोलिंग दरम्यान सदरील ठिकाणी सर्व काही बंद होते, मात्र वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार ह्या आपल्या पथकासह पहाटे या ठिकाणी जाऊन धाड टाकली रात्री दोन वाजेपर्यंत पेट्रोलिंग केल्यानंतर कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सगळे ठिकाणी धाड टाकून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.