मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मोसमी पावसाची वाटचाल हिंगोली जिल्ह्यातून कासव गतीने सुरू आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारली. दोन दिवसापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मेच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणारा पाऊस यंदा जून मध्येही पडला नाही. जून महिन्यात अल्पसा पाऊस झाला. आत्ता जुलै महिन्यात दोन दिवसापासून पाऊस पडू लागलाय. पावसाची आत्तापर्यंत वार्षिक सरासरी 15.93% इतकी असून गेल्या 24 तासात 12. 60 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात 13 जुलै रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 12.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 126.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 15.93 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज 13 जुलै, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.
हिंगोली 24.60 (149.50) मि.मी., कळमनुरी 15.90 (145.20) मि.मी., वसमत 1.30 (125.80) मि.मी., औंढा नागनाथ 11.50 (105.50) मि.मी, सेनगांव 9.50 (98.70) मि.मी पाऊस झाला आहे.
याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 126.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.