मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणारी अटल गुन्हेगारी टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. यावेळी 1 लाख 5 हजार रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन चोरीचे गुन्हे होते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरील सोयाबीन चोरीचे गुन्हे उघड करून सदर गुन्हे करणाऱ्या टोळीस पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेत सदरचे गुन्हे हे युवराजसिंग देवासिंग बावरी (वय 20 वर्ष), अक्षय रमेश पवार (वय 20 वर्ष),
प्रेमसिंग सतनामसिंग टाक (वय 20 वर्षे), राजेश उर्फ सोन्या बंडू झुंबडे (वय 20 वर्ष सर्व रा. इंदिरानगर कळमनुरी) व कृष्णा भारत असोले (वय 20 वर्ष रा. असोलवाडी ता. कळमनुरी) यांनी मिळून केल्याबाबत तपास पथकाला माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींना सापळा रुचून सीताफिने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत सात चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
आरोपींकडून कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतील सोयाबीन चोरीचे 7 गुन्हे उघड करण्यात आले.
तपासात त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरून नेलेले सोयाबीनचे कट्टे एकूण 30 कट्टे (किंमत 75 हजार रुपये) व मोबाईल असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजूसिंग ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले यांनी केली.
10 दिवसात 25 गुन्ह्यांचा लावला छडा
स्थानिक गुन्हे शाखेत नव्यानेच पोलीस निरीक्षक पदी रुजू झालेले विकास पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेत हजर झालेल्या पहिल्याच दिवशी मोटार सायकल चोरीचे पाच गुन्हे उघड करून पहिल्याच दिवसापासून दमदार कामगिरीस सुरुवात केली आणि आपले स्थानिक गुन्हे शाखेत काम करण्याबाबतचे इरादे स्पष्ट केले. ते रुजू झाल्यापासून अवघ्या 10 दिवसांमध्ये गुन्हे शाखेने जवळपास 25 गुन्ह्याचा छडा लावला आहे.