मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना बारा तासात अटक करून मुद्देमाल ही हस्तगत करण्यात हट्टा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
19 नोव्हेंबर रोजी फिर्यादी सचिन साहेबराव कांबळे (वय 23 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. रीसाला बाजार हिंगोली) यांनी हट्टा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की 26 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुभाष गणेश लोणकर (रा. समसापुर ता. जि. परभणी), प्रशांत सिद्धार्थ साळवे (रा. सावंगी ता. वसमत) यांनी मौजे करंजाळा गावातील इंडस (आयडिया वोडाफोन) टॉवर बी टी एस मधील सहा डी आर यु कार्ड (ज्यांची अंदाजे किंमत 40 हजार रुपये) हे त्यांच्या मोटार सायकलवर चोरून नेले अशी फिर्याद हट्टा पोलीस ठाण्यात दिल्यावरून भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पोलीस नाईक ताम्रध्वज कासले, इमरान कादरी व पोलीस कॉन्स्टेबल शेख मदार यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी प्रशांत सिद्धार्थ साळवे (रा. सावंगी ता. वसमत) याचा शोध घेऊन आरोपीस तात्काळ अटक केली व तपास करून त्याचा साथीदारालाही पकडण्यात आले दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही जप्त करण्यात आली आहे. ही कार्यवाही हट्टा पोलिसांनी 12 तासाच्या आत केल्याने नागरिकांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.