मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / यशवंत दनाने :-
सातारा – जिल्ह्यातील लोणंद येथील श्री कालभैरवनाथ देवाची यात्रा प्रारंभ झाली आहे. यात्रेनिमित्त गौतमी पाटीलचा लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने रसिक, प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री कालभैरवनाथ देवाची यात्रा प्रारंभ झाली आहे. श्री कालभैरवनाथ देवाच्या दर्शनासाठी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक – भक्त लोणंद येथे दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी श्री कालभैरवनाथ देवाचे दर्शन घेतले.
भाविक भक्ताकडून मोठ्या श्रद्धेने श्री कालभैरवनाथ यांची पूजाअर्चा करून दर्शन घेतले जाते. श्री कालभैरवनाथ देवाच्या दर्शनासाठी दररोज भाविक भक्तांची येथे रांग लागलेली असते. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी येथे गर्दी केली आहे.
यात्रेत 9 मे रोजी गौतमी पाटीलच्या लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावून गौतमी पाटील च्या लावण्यांना दाद दिली. यावेळी गौतमी पाटील च्या विविध लावण्याचे सादरीकरण झाले.