मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील आगाराची औंढा नागनाथ तालुक्यातील खिल्लार येथे जाणाऱ्या बसचा व मोटरसायकलचा भोसी येथे अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा अत्यावश्य झाला आहे. सदरील तरुणास हिंगोली येथे उपचारासाठी आणले जात असल्याची प्राथमिक माहिती समजते.
ही घटना 2 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगारातून औंढा नागनाथ तालुक्यातील खिल्लार येथे जाणाऱ्या बस व मोटार सायकलचा भोसी येथे भीषण अपघात झाला.
या अपघातात मोटार सायकल वरून एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा अत्यावस्त असल्याचे समजते.
हे दोन्ही तरुण जांभरून आंध येथील असल्याची प्राथमिक माहिती समजते. हिंगोली आगारातून बस क्रमांक एम एच 20 बी एल 1108 ही बस पहाटे आठ वाजता खिल्लार येथे जात होती अशी माहिती मिळते.
अपघातातील अत्यावश्त झालेल्या एका तरुणास हिंगोली येथे उपचारासाठी आणले जात असल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.