Marmik
Hingoli live

राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार : गुणांकनासाठी नेमल्या वेगवेगळ्या समित्या, ग्रामसेवक संघाचे ग्रामविकास सचिवांना निवेदन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2020 – 21 व 2021 – 22 साठी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सदरील पुरस्कारासाठी दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विहित काल मर्यादेत प्रस्ताव सादर केले होते; मात्र प्रस्ताव सादर करण्याची तारीख निघून गेल्यानंतर आणखी प्रस्ताव सादर झाल्याने जिल्हा परिषदे कडून सदरील प्रस्तावासाठी वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या. या समितांनी त्यांचा वेगवेगळ्या अहवाल सादर करून आता दोन नावे पाठविली आहेत. विशेष म्हणजे आधी प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सदरील प्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ कोल्हापूर जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने ग्रामविकास विभाग सचिवांना (मंत्रालय मुंबई) निवेदन देण्यात आले आहे.

राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2020 – 21 व 2021 – 22 साठी सेनगाव पंचायत समिती अंतर्गत संतोष पोपटराव मेनकुदळे व अरुण बबनराव वाबळे या दोन ग्राम विकास अधिकाऱ्यांनी विहित कालावधीत त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेस सादर केले होते. जिल्हा परिषदे कडून सदरील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आले होते.

मात्र सदरील पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेने प्रति वर्षासाठी दोन ते तीन नावांची शिफारस केलेली आहे. याप्रमाणे जर भविष्यात सर्वच जिल्हा परिषदांकडून पुरस्कारासाठी दोन ते तीन नावांची शिफारस केली तर चुकीची प्रथा सुरू होईल. तसेच यामुळे पुरस्काराला अर्थ राहणार नाही. पाठविलेल्या प्रस्तावांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडून पुन्हा सखोल तपासणी करून शिफारस केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावांच्या गुणांकन तक्त्यासह आपले स्वयं स्पष्ट अभिप्राय नमूद करून प्रस्ताव फेरसागर करण्याबाबत शासनाने कळविण्याचे उप आयुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी च्या पत्रान्वय हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले होते.

यावरून हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 11 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वय ग्रामसेवक संतोष पोपट मेनकुदळे, प्रसन्न लक्ष्मणराव जोशी, रवी लक्ष्मणराव चिलागार, अरुण बबनराव वाबळे, सिद्धार्थ बळीराम धुळे, राजेश रामकृष्ण किलचे या ग्रामसेवकांचे पुरस्कार प्रस्तावाच्या अनुषंगाने तपासणी करण्याबाबत औंढा नागनाथ पंचायत समिती गटविकास अधिकारी बी. आर. गोरे. कळमनुरी पंचायत समिती विस्तार अधिकारी व्ही. एस. पाईकराव वसमत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी आर. यस. बोईनवाड यांची तपासणीसाठी हिंगोली पंचायत समिती अंतर्गत समिती नेमण्यात आली.

तर हिंगोली पंचायत समिती गटविकास अधिकारी जी.पी. बोथीकर औंढा नागनाथ पंचायत समिती विस्तार अधिकारी ए. सी. पुरी कळमनुरी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी जी. व्ही. हिबारे यांची सेनगाव पंचायत समिती अंतर्गत समिती नेमण्यात आली.

तसेच कळमनुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी पी. एस. बोंढारे हिंगोली पंचायत समिती विस्तार अधिकारी व्ही. एस. भोजे व औंढा नागनाथ पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी के. एन. इंगोले यांची वसमत पंचायत समिती तपासणीसाठी समिती नेमण्यात आली होती. सदरील पुरस्कारासाठी वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्याने या समित्यांचे अहवालही वेगवेगळे आले.

त्यामुळे चांगली कामे करूनही आपणास सदरील पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आल्याची भावना या ग्रामसेवकांमधून व्यक्त होत आहे. वेळेत प्रस्ताव सादर करणाऱ्यांची नावे यातून वगळण्यात आले असून वसमत पंचायत समिती मधून प्रसन्न लक्ष्मणराव जोशी व सिद्धार्थ बळीराम धुळे यांची नावे पाठविण्यात आली आहेत.

सदरील प्रकरणी एकच जिल्हास्तरावरील एकाच समितीकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ कोल्हापूर जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांची स्वाक्षरी आहे.

Related posts

नुकसान भरपाई : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 180 कोटी रुपये द्या, मुख्यमंत्र्यांकडे खासदार हेमंत पाटील यांची मागणी

Santosh Awchar

विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे 27 डिसेंबर पासून विधानभवनासमोर उपोषण

Gajanan Jogdand

लोकन्यायालयामध्ये 3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपयांची प्रकरणे निकाली

Santosh Awchar

Leave a Comment