Marmik
Hingoli live

सेनगाव ग्रामीण रुग्णालयाची राज्यस्तरीय गुणांकन तपासणी; पथकाने केले समाधान व्यक्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-

सेनगाव – येथील ग्रामीण रुग्णालयाची कायाकल्प अंतर्गत राज्यस्तरीय पथकाने 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय गुणांकन तपासणी केली यावेळी सदरील पथकाने रुग्णालयातील तसेच रुग्णालयाबाहेरील स्वच्छता व नीटनेटकेपणा तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सेवा सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

कायाकल्प अंतर्गत सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे राज्यस्तरीय गुणांकन व तपासणी करीता डॉ. सचिन काशिद (जिल्हा रुग्णालय छ.संभाजीनगर), डॉ.खालीद पठाण (जिल्हा रुग्णालय छ.संभाजीनगर) व डॉ.प्रशांत पुठावार यांच्या विशेष टीमने दुसऱ्या वेळेस रुग्णालयास भेट देऊन प्रत्येक विभागाची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल माहिती घेतली.

सर्व प्रथम दर्शनी भागामधील रंग, रांगोळी काढण्यात आली होती. सर्वत्र आतील व बाहेरील परिसर अतिशय स्वच्छ असलेल्या स्वच्छतेने रूग्णालय उजळून निघाले होते. तसेच प्रत्येक विभागाने उलखनीय काम केल्याचे दिसून आले. रुग्णालयातील रुग्णांना दिलेल्या सेवा बाबतचे अहवाल खूपच समाधानकारक असल्याचे दिसून आले.

रुग्णाकरीता विविध शासनाच्या योजनांचे व माहितीचे माहिती फलक भिंतीवर लावण्यात आले होते. रुग्णालयातील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची व शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था व 24 तास प्रसूती सेवा उपलब्ध असल्याने समाधान व्यक्त केले आहे.

रुग्णालयीन कायाकल्प गुणांकन तपासणी करीता हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोरे, डॉ. मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण कुऱ्हाडे, गोपाळ कदम यांच्या कुशल मार्गदर्शना खाली सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन व्ही. राठोड, डॉ. विनय व्ही.बगाटे, वैद्यकीय अधिकार डॉ. गणेश बंड्रेवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथील सर्व वैद्यकीय अधिकारी,

कर्मचारी तसेच औषध निर्माण अधिकारी सपना बरडे, लिपिक कंडेरे, परिसेविका रूपालीताई खोलगडे, अधीपरिचारिका प्रतिमाताई बगाटे, श्रीमती माधुरी कदम, कुमारी. शितल बगाटे, कुमारी प्राजक्ता उघडे, सपना धोतरे, शितल चेने व इतर सर्व अधिपरिचारिका, समुपदेशक किशोर वानखेडे, संदिप राठोड, लॅबतंत्रज्ञ विद्या तोर (चव्हाण), स्वाती पारसकर,

अतुल कबडी, रेणुका हागे, कक्ष सेवक संदीप मोरे, अनिल भगत, गजानन झगरे, बालाजी आडे, १०२ रुग्णाहिका चालक शुभम धाबे, १०८ रुग्णवाहिका चालक बबन बोरकर, मेस्को चे सर्व सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी मनोहर धवसे, सागर भारती, वंदना सुतार इतर सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कायाकल्प अंतर्गत रूग्णालयास गुनांकन मिळण्यासाठी परिश्रम घेतले.

Related posts

…अन्यथा जि. प. प्रशासन आणि इतरांना बांगड्यांचा आहेर करू – विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल

Gajanan Jogdand

वाढत्या अपघातांना आळा बसण्यासाठी हिंगोली येथे सडक सुरक्षा अभियान

Santosh Awchar

कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे शेती विषयी दोन दिवशीय प्रशिक्षण

Santosh Awchar

Leave a Comment