मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिल(NGO) ची राज्यस्तरीय बैठक दिं.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजीत करण्यात आलेली आहे.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या शहीदांना श्रध्दांजली अर्पीत करून बैठकीस सुरुवात करण्यात येणार आहे या मध्ये मागील बैठकीमध्ये निर्धारीत केल्याप्रमाणे केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
सदर बैठकीमध्ये स्वयसेवक नोंदणी, संघटन बांधणी, NGO चा विस्तार, सामाजीक कार्यकते व प्रतिष्ठित व्यक्तींना संघटनेत समाविष्ट करण्यासाठी नियोजन यावर सविस्तर विचार विनीमय करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये शासनातर्फे कोट्यावधीचा अनुदान व पगार देऊनसुध्दा दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरिबांना चांगल्या शिक्षणापासुन वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या विविध योजनेमध्ये होणाऱ्या भ्रष्ट्राचारामुळे विद्यार्थी -विद्यार्थीनीना अनेक सोई सुविधेपासुन वंचित राहावे लागत आहे.
तसेच शालेय पोषण आहार योजनेमधील भ्रष्ट्राचार, स्वस्त धान्य दुकानदारांकडुन लाभार्थ्यांची होणारी पिळवणुक, कमी प्रमाणात अन्नधान्य पुरवठा व होत असलेली आर्थिक लुट, शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकारासंबंधी होत असलेला त्रास, हिंगोली येथील नारायण नगर सर्वे क्र॑.97 मध्ये खोट्या कागदपत्राच्या आधारावर अनियमीतपणे बांधकाम परवानगी घेऊन शासनाची फसवणुक करणाऱ्या बडेरा दाम्पत्य यांच्या विरुध्दच्या निवेदन व पाठपुराव्यावरील आढावा तसेच मागील अनेक महिन्यापासुन विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलव्दारे सुरु करण्यात आलेल्या लढ्यामध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील आंदोलनाची व कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.
यासोबत सदर बैठकीमध्ये ईतर समस्या व मुद्दे उपस्थित करावयाचे असल्यास प्रदेश प्रमुख महासचिव प्रा.फिरोज पठाण, हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासीत, जिल्हा उपाध्यक्ष रवी जैस्वाल, जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज,जिल्हा महासचिव सतिश लोणकर, तालुकाध्यक्ष शेख आवेज, शहराध्यक्ष पठाण साजीद खान,वि.स.जिल्हाध्यक्ष शेख अफरोज, युवक शहराध्यक्ष मो.आमेर बागबान व ईतरांशी संपर्क करुन कळवावे.
सदर बैठकीची सुचना सर्व स्वंयसेवकांना व पदाधिकाऱ्यांना मोबाईल, व्हॉटसअप, ई-मेलव्दारे, सोशल मिडीयाव्दारे देण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये जास्तीत जास्त स्वंयसेवक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद यांनी केलेले आहे.