मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण विषयी कारवाई न झाल्यास त्याच्या निषेधार्थ 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य विधान भवन समोर सामूहिक आत्मदहनाचा आंदोलन करण्यात येणार आहे. हा निर्णय हिंगोली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली आज दिं.13 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये मागील कार्याचा आढावा घेण्यात आला. संघटन बांधणी,नवीन स्वंयसेवक नोंदणी मोठया प्रमाणात करण्याचे तसेच विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने केलेले सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवावे अश्या सूचना संस्थापक अध्यक्ष यांनी केले.
सामाजिक विषयी चर्चा करण्यात आली. यात शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसगत कर्ज माफ करावे, भ्रष्ट्राचारी दोषी अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक,शिक्षणधिकारी प्रा.संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनवर तात्काळ कार्यवाही करून निलंबित करावे, शालेय पोषण आहार योजने बाबत तात्काळ भरारी पथक स्थापन करून, सन 2015-16 ते 2019-20 पर्यंत राज्य लेखापरिक्षण करावे, अनुदानीत शाळांव्दारे RTE कायद्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करावी,हिंगोली जिल्ह्यातील अन्नधान्य काळाबाजारीस आळा घालून दोषींवर कार्यवाही करावी,स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभारास आळा घालून पात्र लाभार्थ्याना नियमित माल मिळावे, बडेरा दाम्पत्य यांच्याव्दारे शासनाची फसवणुक करून नियमा विरुध्द बांधकाम व डि.पी.रोडच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात आली.
या व ईतर सर्व प्रश्ना विषय जिल्हाधिकारी मार्फत शासनास निवेदन सादर करून तीव्र जन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्याच प्रमाणे शिक्षण विषयी कार्यवाही न झाल्यास त्याच्या निषेधार्थ दि.23 ऑगस्ट 2022 रोजी विधानभवन महाराष्ट्र समोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
बैठक संपल्या नंतर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आले होते सदरील रॅलीसही चांगला प्रतिसाद मिळाला.
या बैठकी मध्ये संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्यासह प्रा.पठाण फेरोज खान, शेख नौमान, तौफिक अहमद, Adv. सय्यद शोएब, शाहनवाज हुसेन, शेख बासित, मिलिंद कंकाळ, सतीश लोणकर,साजिद अतार, शेख अवेज, पठाण साजिद खान, मो.मुबीन,सय्यद इमाम, ऐजाज रजा,खालिद पटेल,हाजी हुसेन, आमेर, तौहीद, मुखीद, सोहेल,अफजल, शकील, परवेज, कलीम मौला, सर्व बागबान, अफरोज फेरोज,शेख हमीद, सय्यद गौस, कलीम खान, युसूफ खान गुड्डू, पठाण आलम खान, मो. हाशीर फैजान पठाण रउफ खान, नितीन तपासे इत्यादी अनेक पदाधिकारी व स्वयंमसेवक उपस्थित होते असे एनजीओचे राष्ट्रीय संचालक तथा प्रसिद्धीप्रमुख शेख नौमान नवेद यांनी कळविले आहे.