Marmik
Love हिंगोली

विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची राज्यस्तरीय बैठक संपन्न; राहोली बु.चे सरपंच सोडगीर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींल (NGO) ची राज्यस्तरीय बैठक दिं.3.12.2022 रोजी संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे संपन्न झाली.या बैठकी मध्ये मागील बैठकीमध्ये निर्धारीत केल्याप्रमाणे झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला व जिल्हाध्यक्ष या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासीत महेबुब यांना सोपविण्यात आला.

या बैठकीमध्ये जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासीत महेबुब यांनी 1 ली ते 10 पर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शासनातर्फे दरवषी देण्यात येणारी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनातर्फे अचानक बंद करुन विद्यार्थ्याना दैनदिन शालेय साहित्या साठी मिळणाऱ्या अनुदानापासुन वंचित केल्याचा मुद्दा मांडला.

यावर बैठकीमध्ये चर्चा करुन सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला की, शासनाने यावर पुर्नविचार करुन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती देण्याबाबत योग्य ते उपाययोजना करुन सदर शिष्यवृत्ती योजना पुर्वीप्रमाणेच सुरु ठेवावी.

सदर बैठकीमध्ये राहोली बु. चे सरपंच ज्ञानेश्वर सोडगीर यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलमध्ये स्वयसेवक म्हणुन प्रवेश घेतला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या हस्ते त्यांचे व त्यांच्यासह प्रवेशितांचे पुष्पहार घालुन स्वागत करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यानंतर बैठकीमध्ये आपल्या NGO मार्फत करण्यात येत असलेले सामाजिक कार्य सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावे. त्याचप्रमाणे नवीन स्वयसेवक नोंदणी, संघटन बांधणी बाबत चर्चा करुन सामाजीक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्‍तींना संघटनेत समाविष्ट करण्यात यावे याकरिता मार्गदर्शन देण्यात आले.

त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यासह राज्यामध्ये शासकीय व अनुदानीत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण,शासनाच्या योजनांचा शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत संपुर्ण लाभ पोहोचविणे,शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकाप्रती अधिकारी व कर्मचारी यांची जवाबदारी निश्‍चिती, नारायण नगर हिंगोली येथील सर्वे क्र॑.97 मध्ये खोट्या कागदपत्राआधारे केलेली खरेदी व त्याआधारे अनियमीतपणे घेतलेल्या बांधकाम परवानगी प्रकरण, स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची होत असलेली पिळवणुक, शासकीय कामामध्ये पारदर्शीतेसंबंधी एकमेव कायदा माहिती अधिकार संपविण्या संबंधी शासकीय अधिकारी व कर्मचारीव्दारा होत असलेल्या प्रयत्नाविरुध्द लढा,सध्या सुरु होणाऱ्या मुलाखतीआधारे शिक्षक भरती, परीक्षांव्दारे पोलीस भरती, तलाठी भरती व विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये पारदर्शकपणे योग्य उमेदवारांची निवड व्हावी याकरिता प्रामाणिक प्रयत्न व जागरुकता याबाबत चर्चा करुन विचार विनीमय करुन असे ठरविण्यात आले की, याबाबत जिल्हाधिकारी मार्फत शासनास निवेदन सादर करुन नियमानुसार कार्यवाही करावी नसता तिव्र जनआंदोलन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलव्दारा सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्याविषयी व हितासंबंधी कार्य करणाऱ्या स्वंयसेवकांना जास्तीत जास्त पाठबळ व सहकार्य करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही सामाजीक मुद्यासंबंधी सहकार्य आवश्यक असल्यास संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्यासह सर्व पदाधिकारी यांना संपर्क करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

या बैठकीमध्ये शेख नईम शेख लाल सह, राष्ट्रीय संचालक शेख नोमान नवेद, जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासीत, रवी जैस्वाल, शेख शाहनवाज, सतिश लोणकर, शेख आवेज, पठाण साजीद खान, शेख अफरोज, अँड स.शोएब, सरपंच ज्ञानेश्वर सोडगीर,पठाण मुजाहीद खान, शेख साजीद अत्तार, शेख एजाज रजा,सयद शोकत, जावेद चाऊस, मिलीद कंकाळ, शेख हमीद, मो.शोएब बागबान, मो.मुबीन, शेख अजमत, मो.मुखीद बागबान, शेख शकील बागबान, सय्यद गोस नुर, पठाण कलीम खान, पठाण आलमखाँ, पठाण रऊफखा, युसुफ खान ऊर्फ गुडु,शे.अफजल,मो.हाशीर, शेख अदनान पहेलवान,नितीन गालफाडे,शे.मुबीन गोरेगांब,मो.जफर बागबान,प्रविण सोडगीर,शेख इम्रान, शेख रहीम सर्पमित्र, शेख गौस, पंकज सोडगीर,शेख रहेमत,सुभान पठाण, शेख अतीक,फिरोज चाऊस, मो.परवेज,मो.तोहीब बागबान, मो.आमेर बागबानवअनेक पदाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

Related posts

अनुसुया बाल विद्या मंदिरातील लहानग्यांचे ‘पावले चालती पंढरीची वाट…’

Santosh Awchar

संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हिंगोली येथे वृक्षारोपण

Santosh Awchar

जागतिक आदिवासी दिन : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी नोंदवला मणिपूर घटनेचा निषेध

Santosh Awchar

Leave a Comment