मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :-
हिंगोली – सेनगाव येथील तोषनीवाल महाविद्यालयाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे प्रदेश सरचिटणीस यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचा निवेदन दिले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून काही वर्षांपूर्वी मुलींच्या वसतिगृहासाठी अनुदान घेतले होते. या अनुदानातून विद्यालय महाविद्यालय परिसरात मुलींचे वसतिगृह बांधले खरे मात्र सदरील वसतिगृह हे मुलींना काही मिळाले नाही.
या वस्तीगृहात मुलींना प्रवेश कधी मिळालाच नाही. सद्यस्थितीला या वसतिगृहाच्या इमारतीत महाविद्यालयाकडून ये आर टी एम इंग्लिश स्कूल सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तोष्णीवाल महाविद्यालयाने ज्या उद्देशाने अनुदान घेतले तो उद्देश कधीच पूर्ण झाला नाही.
सेनगाव शहर व तालुक्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील मुलींना या वसतीगृहात प्रवेश न दिल्याने त्यांना महाविद्यालयात खाजगी वाहने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने तोषनीवाल महाविद्यालयातील दिलेल्या निधीचा तोषनीवाल महाविद्यालय संचालक प्राचार्य सचिव यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला आहे.
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या महाविद्यालयात मिळालेले अनुदान परत घेण्यात यावे आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहांची मान्यता रद्द करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.