मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – महाराष्ट्राचे आगामी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मातंग समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या अधिवेशनात लक्षवेधी तारांकित प्रश्न करून त्या सोडविण्यात याव्यात यासाठी हिंगोली येथील सकल मातंग समाज व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती 2023 च्या वतीने हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांना नुकतीच गळ घालण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे यांनी आमदार मुटकुळे यांच्यासमोर मागण्यांचे वाचन केले.
प्रमुख मागण्या :-
अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचे अ,ब,क,ड,वर्गीकरण केलेच पाहिजे.
साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था ( आर्टी ) ची स्थापना झाली च पाहिजे.
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी झालीच पाहिजे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा 9 वर्षाचा थकीत निधी देऊन महामंडळ पूर्ण क्षमतेने चालू झालेच पाहिजे.
शहीद संजय भाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत देऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन झालेच पाहिजे.
या प्रमुख मागण्यांचे निवेदन 15 जुलै रोजी सकल मातंग समाजाच्या हिंगोली चे माजी नगराध्यक्ष वतीने बबनराव शिखरे यांनी सदरील निवेदनाचे वाचन करून आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्याकडे सादर केले.
यावेळी हिंगोली येथील सकल मातंग समाज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव 2023 चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.