Marmik
Hingoli live क्राईम

ज्या शाळेत शिकले तिथेच केली चोरी! शेतकऱ्यांचे मोटार पंप व शाळेतील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉल वरील मोटारपंप व शाळेतील साहित्य चोरी करणारी टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडली आहे. या टोळीकडून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यासह एकूण पाच गुन्हे देखील या टोळीकडून उघडकीस आणण्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉल वरील मोटार पंप चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांच्या विविध पोलीस ठाण्यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून गुन्हे देखील दाखल झाले होते.

हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शेतकऱ्यांच्या मोटारपंप चोरणाऱ्या आरोपींचा छेडा लावून गुन्हे उघड करण्याबाबत हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक तपास काम करीत होते.

29 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून येहळेगाव तुकाराम येथील आरोपी विक्रम उर्फ बंटी दत्तराव काळे, ज्ञानेश्वर भीमराव काळे, संकेत पुंजाराम कवाणे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर फरार आरोपी तिरुपती उर्फ बाळू किसन जानकर, आकाश मेटकर, गजानन धोंडबाराव पतंगे यांच्यासह मिळून मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दहा वर्षांपूर्वी शाळा फोडल्याची कबुली देखील दिली.

या संदर्भाने आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे 72 / 2013 कलम 457, 380 हा भादवि गुन्हा उघड करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील गेलामाल मोटार पंप व शाळेतील टीव्ही मो. सा. असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला ही.

कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र सावळे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.

कानून के हात बहुत लंबे होते है’..!

शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरणाऱ्या या टोळीने ज्या शाळेत शिक्षण घेतले तीच शाळा 2013 या वर्षी फोडली; मात्र पोलिसांनी दहा वर्षानंतर सुद्धा स्वतःचीच शाळा फोडणाऱ्या या चोरट्यांचा छडा लावून त्यांना जेरबंद केले. ‘कानून के हात बहुत लंबे होते है’ या युक्तीचा येथे प्रत्यय आला.

Related posts

हट्टा, कुरुंदा व आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याने केली उत्कृष्ट कामगिरी! पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्रक व बक्षीस जाहीर

Santosh Awchar

5 एप्रिल रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन

Santosh Awchar

तीन गुन्हेगार दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार, सतत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुद्ध पोलीस अधीक्षकांची कठोर कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment