मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी येथील शेत शिवारातून चोरीला गेलेली दहा क्विंटल सोयाबीन पोलिसांनी शोधून सदरील सोयाबीन शेतकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांना पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
5 डिसेंबर रोजी कळमनुरी येथील शेत शिवारातून शिवराज चौधरी पाटील राहणार कळमनुरी यांची दहा क्विंटल सोयाबीन चोरीस गेली होती.
याप्रकरणी कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेला दहा क्विंटल सोयाबीनचा माल व आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी राजू संभाजी करवंदे रा. मुडी, तालुका वसमत व इतर तिघाजणांकडून सोयाबीन जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरील सोयाबीन शेतकरी शिवराज पाटील चौधरी यांना देण्यात आली आहे.
ही कारवाई बीट जमादार माधव भडके पोलीस कर्मचारी राठोड यांनी केली.