मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सरकारच्या विविध शासकीय धोरण तसेच खाजगीकरणाविरुद्ध कळमनुरी येथे विद्यार्थी कृती समिती हिंगोली च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 25 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन देण्यात आले.
आज घडीला स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी हे मानसिक तान तणावात जीवन जगत आहेत. त्यास सरकारचे शासकीय धोरण म्हणजे सरकारी यंत्रणा जबाबदार आहे.
विद्यार्थी हे घरदार सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. एक स्वप्न घेऊन रात्रंदिवस स्पर्धा परीक्षांची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे.
मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांच्या जीवाशी खेळत आहे स्पर्धा परीक्षा शुल्क अतिप्रमाणात वाढवून सरकारी पद ही कंत्राट पद्धतीने भरवण्याचा शासकीय निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा केंद्र ही तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर दिले जात आहे. या गोष्टींमुळे विद्यार्थी मानसिक ताणतणावात जगत आहेत.
त्यामुळे शासनाने जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण तात्काळ थांबवावे. परीक्षा शुल्क कमी करून सर्वसामान्य, गरीब, होतकरू, वंचित विद्यार्थी भरू शकेल एवढे परीक्षा शुल्क घ्यावे. कंत्राट पद्धतीने होणारी भरती कायमस्वरूपी रद्द करावी.
परीक्षा केंद्र नजीकचे देण्यात यावे. मुक्त विद्यापीठाची परीक्षा शुल्क कमी करावे, अशा विविध मागण्या करण्यात आले आहेत. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
या मोर्चात प्रा. भगवानराव मस्के, रवी इंगोले, राज शिंदे, अक्षय चंदेल,डॉ कल्याणकर, डॉ. वाघमोडे, डॉ. एल. डी. कदम, ॲड.रवी शिंदे, गोपू पाटील, राजू पाटील, मारोतराव खांडेकर, संदीप भुकतार, प्रा. गुनानंद पतंगे यांच्यासह मोठ्या संख्येने संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी प्राध्यापक कुरुंद व इतर नागरिक उपस्थित होते.