मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – दक्षिण मध्य रेल्वे तील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पूर्णा ते हिंगोली लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून याचे इलेक्ट्रिक लोको टेस्टिंग 2 मार्च रोजी सायंकाळी यशस्वीरित्या करण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेचे पूर्ण हे महत्त्वाचे ठिकाण असून येथून रेल्वे गाड्यांच्या इंजन मध्ये डिझेल व पेट्रोल भरले जाते.
या ठिकाणावरून हिंगोली मार्फत विदर्भासही रेल्वे लाईन जोडलेली असून याच ठिकाणावरून नांदेड मार्फत पुढे इतर राज्यात रेल्वे लाईन जोडलेले आहे. मराठवाड्यातील रेल्वेचे जाळे विस्तृत करण्यासंदर्भात रेल्वे संघर्ष समितीने अनेक वेळा मागणी केली होती. तसेच स्व. राजीव सातव यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला.
यानुसार परभणी ते पूर्णा रेल्वेचे दोन रूळ कार्यान्वित झालेले आहेत आता पूर्णा ते हिंगोली रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले झालेले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. हिंगोली ते पूर्णा रेल्वे विद्युतीकरण मार्गाची 2 मार्च रोजी लोको टेस्टिंग घेण्यात आली.
सदरील टेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण झाली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्यासह रेल्वे हक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगोली ते पूर्णा रेल्वेच्या विद्युतीकरणामागे स्व. राजीव सातव यांचे मोठे योगदान असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.