मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का लागू नये तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगोली येथील दहशतवाद विरोधी शाखेकडून 17 जुलै रोजी हिंगोलीतील सर्व लाजची अचानक तपासणी करण्यात आली.
हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या सूचनेप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही व सामाजिक शांतता अबाधित राहील या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखेला काही विशेष सूचना दिलेल्या आहेत.
या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखा हिंगोलीच्या वतीने जिल्ह्यातील देशविघातक कृत्य करणारे किंवा सदर कृत्यास समर्थन करणारे किंवा तसा प्रयत्न करणारे याची गोपनीय माहिती काढून वेळीच कायदेशीर कार्यवाही करण्यात येते.
खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व लॉजेस, हॉटेल्स ,परवानाधारक स्फोटके बाळगणारे, जुन्या गाड्यांचा खरेदी विक्री व्यवसाय करणारे, परदेशवारी करणारे, रूम भाड्याने देणारे यांची नियमित तपासणी करण्यात येते व बेकायदेशीर कृत्य आढळल्यास कठोर कार्यवाही करण्यात येते.
त्या अनुषंगाने दिनांक 17 जुलै रोजी दहशतवाद विरोधी शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी हिंगोलीतील सर्व लॉजेसशी अचानक तपासणी करून रेकॉर्डची पाहणी करण्यात आली आहे. यापुढे सुद्धा दहशतवाद विरोधी शाखेचे नियमित तपासणीचे काम चालू राहणार आहे.
त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व लॉज धारकांना व हॉटेल धारकांना व भाड्याने रूम देणारे इसमांना सुचित करण्यात येते की आपण कोणत्याही नवीन व्यक्तीचे आधार कार्ड पाहून परिपूर्ण ओळख पटवून खात्री झाल्यानंतरच योग्य व्यवहार करावा. तसेच काही संशयित आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली किंवा दहशतवाद विरोधी शाखा हिंगोली येथे तात्काळ संपर्क करावा.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक एस.एस. घेवारे, पोलीस अमलदार धनंजय पुजारी, दिलीप बांगर, सचिन गोरले, शफीयोद्दीन शेख , अब्दुल रहीम यांच्या पथकाने केली.