Marmik
लाइफ स्टाइल सिनेमा

‘सुपरस्टार सिंगर’ रंगणार सोनी मराठीवर, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा’

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्रातील नव्या दमाच्या युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, संगीताचा ‘सुरेल’ नजराणा रसिकांना देणारा ‘सुपरस्टार सिंगर’ हा नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर लवकरच रंगणार आहे. सोनीच्या हिंदी वाहिनीवरील ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमाच्या तीनही सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर रंगणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक आकर्षक प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे नव्या मराठी संगीत पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘ताल, लय आणि सूर यांची बहारदार मैफिल रंगणार कारण, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा’ ‘सुपरस्टार सिंगर’ अशा टॅग लाईनसह आलेल्या या धमाकेदार कार्यक्रमाची आणि सदाबहार गाण्यांची सुरेल पर्वणी महाराष्ट्राच्या रसिकांना मिळणार आहे.

एक नवा आश्वासक सूर शोधण्याचा प्रवास १० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. २४ ऑगस्टपर्यंत स्पर्धेच्या ऑडिशन्स सुरु राहणार आहेत. याकरीता ५ ते ३० हा वयोगट असणार आहे. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत रंगणार आहे सूरांचं अद्वितीय पर्व.

या ऑडिशन्स सोनी लिव्हवर पाठवता येतील. सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना दिले आहेत. ‘सुपरस्टार सिंगर’ हा असाच एक नवा कार्यक्रम त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.

आपल्याकडे उत्तम प्रतिभा आहे, फक्त या गुणी हिऱ्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.’सुपरस्टार सिंगर’ या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीने अशा गुणवान प्रतिभावंतासाठी ही संधी उपलब्ध केली आहे.

तुमच्या गाण्याच्या प्रतिभेला हवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. संगीत क्षेत्रातील दिग्गज परिक्षक, अनुभवी मार्गदर्शक यांना सोबत घेऊन सुरू होणारा हा सूरमयी प्रवास कोणासोबत असणार ? याची उत्सुकता अजून काही दिवस असणार आहे ‘सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला. १० ऑगस्टपासून ते २४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता.

Related posts

कौमी एकता क्रिकेट स्पर्धा; कळमनुरी संघ विजयी

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यात 266 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना

Santosh Awchar

जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय गत्यंतर नाही – कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार

Gajanan Jogdand

Leave a Comment