Marmik
Hingoli live

स्वच्छता ही सेवा : गांगलवाडी, वरुड चक्रपान, कुरुंदा येथे स्वच्छता रन रॅली

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील कुरुंदा, गांगलवाडी आणि वरुड चक्रपान या ठिकाणी स्वच्छता रन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील ग्रामस्थांनी कचरा मुक्त गाव करण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता व कचराकुंडीत टाकावा, नियमित शौचालयाचा वापर करावा, सांडपाणी उघड्यावर सोडू नये याबाबत जाणीव जागृती होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्या नियोजनात स्वच्छता रन हा उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात सेनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव कोकाटे, कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बोंढारे, औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोरे, वसमत गटविकास अधिकारी यु. डी. तोटावर, विस्तार, अधिकारी हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बोथीकर यांच्यासह

गटशिक्षणाधिकारी सर्व विस्तार अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा तज्ञ, तालुकास्तरावरील पंचायत समिती अधिकारी कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व बीआरसी, सीआरसी, गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कळमनुरी पंचायत समिती अंतर्गतही स्वच्छता रन कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात गावामध्ये गावामध्ये जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस जलसुरक्षक, रोजगार सेवक, गावातील ग्रामस्थ, युवक, बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

Related posts

देऊळगाव जहागीर ग्रामपंचायतीने केलेल्या 13 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करा; उपसरपंचाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Gajanan Jogdand

पाण्याच्या टाकीसाठी बनविण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय बालिकेचा मृत्यू! वटकळी येथील घटना

Gajanan Jogdand

स्थानिक झेंडूचे दर पडले! बेंगलोर, कोल्हारकडील झेंडू बाजारात दाखल

Gajanan Jogdand

Leave a Comment