मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या डोंगरकडा फाटा येथून अवैधरीच्या व दहशत वाजवण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदरील कार्यवाही शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने केली.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 2 मार्च रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीसाठी आखाडा बाळापूर पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करत होते.
पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत डोंगरकडा फाटा येथे नामे अभिषेक भगीरथ लोमटे (वय 28 वर्ष) हा अवैधरित्या व दहशत वाजवण्याच्या उद्देशाने तलवार बाळगून आहे.
सदरील व्यक्तीस पकडले असता त्याच्या ताब्यातून एका काळ्या रंगाच्या म्यानमध्ये ठेवलेले लोखंडी तलवार (एकूण 34 इंच लांब) जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार शेख बाबर यांच्या तक्रारीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस आमदार शेख बाबर, गजानन पोकळे, गणेश लेकुळे, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.