Marmik
Hingoli live

तलाठी पदभरती: उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन; अडचण आल्यास कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने तलाठी गट-क या पदांची पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनस्तरावरुन जाहिरात प्रसिध्दीस देण्यात आली आहे.               

तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यासाठी अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांनी सूचना दिलेल्या आहेत.               

त्याअनुषंगाने तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आले आहे. या मदत कक्षात पुढील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.               

दिलीप कच्छवे, निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली (भ्रमणध्वनी 9763783001), कार्यालय दू. क्र. 02456-221450, अब्दुल बारी सिध्दीकी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी हिंगोली (भ्रमणध्वनी 9359454840), कार्यालय दू. क्र. 02456-224401, उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, हिंगोली (भ्रमणध्वनी 9970680612) कार्यालय दू.क्र. 02456-221450, महादेव डाखोरे, महसूल सहायक (भ्रमणध्वनी क्र.9011738828) कार्यालय दू. क्र. 02456-222400.               

तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अडचण आल्यास जिल्हास्तरीय मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Related posts

हिवराजा जाटू ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा

Gajanan Jogdand

हिंगोली शहरातील मंगळवारा परिसरातील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध

Gajanan Jogdand

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: खडकपुरा येथील आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी व 21 हजार रुपयांचा दंड

Santosh Awchar

Leave a Comment