Marmik
Hingoli live

सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम: पानकनेरगाव येथे विविध कार्यक्रम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर, सतीश खिल्लारी :-

सेनगाव – हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात सर्व धर्माची शिकवण एकच हा उपक्रम राबविला जात आहे. सदरील उपक्रमा अंतर्गत सेनगाव पोलीस ठाणे यांच्याकडून पानकनेरगाव येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात शांतता नांदली पाहिजे सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांबद्दल आदर व सन्मान बाळगून जातीय व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याकामी प्रशासनास मदत करावी या व्यापक हेतूने हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात जातीय सलोखा व सामाजिक सदभावना हा उपक्रम जिल्हा पोलीस दलाकडून राबविला जात आहे.

सदर उपक्रमांतर्गत सर्व धर्माची एकच शिकवण हा कार्यक्रम जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम ज्यामध्ये व्याख्यान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर तसेच शाळा, महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेतले जात आहेत.

सदर सर्व धर्माची एकच शिकवण उपक्रमांतर्गत सेनगाव पोलीस ठाणे यांनी 25 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे हद्दीतील पानकनेरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी सर्व धर्मातील प्रमुख व्यक्ती धर्मगुरू प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना एकत्र बोलावून व्याख्यानाचा व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास सेनगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, ह. भ. प. नंदू महाराज, मौलाना शेख मोबीन शेख रोशन, भंतेजी बुद्ध कीर्ती, सरपंच कुलदीप देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिक्षण सभापती भैय्यासाहेब देशमुख, गोकुळ ठाकूर, अनंतराव देशमुख, सुखदेव साळवे, पोलीस पाटील, नरवाडे खांडेकर, वाघ, पायघन, पत्रकार बबन सुतार, गजानन देशमुख, शेख फजल तसेच पोलिस अंमलदार परिसरातील ग्रामस्थ युवक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमात पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी प्रास्ताविक करून त्यात सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम घेण्यामागची भूमिका व महत्त्व विशद केले.

कार्यक्रमात उपस्थित प्रमुख व्यक्ती व धर्मगुरू यांनी राष्ट्रीय एकता सर्व धर्म समभाव सामाजिक सद्भावना एकात्मता याबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील, मोहन नरवाडे यांनी केले.

कार्यक्रमानंतर परिसरातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 50 वृक्ष लावून व्यापक प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Related posts

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी होण्याचे जि. प. सीईओ यांचे आवाहन

Gajanan Jogdand

येहळेगाव येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

Gajanan Jogdand

हट्टा, कुरुंदा व आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याने केली उत्कृष्ट कामगिरी! पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्रक व बक्षीस जाहीर

Santosh Awchar

Leave a Comment