Marmik
Hingoli live

सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम: आसेगाव, थोरवा येथील शाळांमध्ये विविध कार्यक्रम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार:-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आसेगाव, थोरवा व विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात शांतता नांदली पाहिजे, सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांबद्दल आदर व सन्मान बाळगून जातीय व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनास मदत करावी या व्यापक हेतुने हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात जातीय सलोखा व सामाजिक सद्भावना उपक्रम जिल्हा पोलीस दलाकडून राबविला जात आहे.

सदर उपक्रमांतर्गत सर्व धर्माची एकच शिकवण हा कार्यक्रम जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम ज्यामध्ये व्याख्यान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर तसेच शाळा महाविद्यालय स्तरावर वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेतले जात आहेत.

या उपक्रमांतर्गत वसमत ग्रामीण पोलीस ठाणे यांनी 22 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील विद्याभारती सेमी इंग्लिश शाळेमध्ये वरील विषयाला अनुसरून वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

चतुरमुख विद्यालय आसेगाव येथे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच थोरवा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये याच विषयाला अनुसरून निबंध स्पर्धा घेण्यात आली. वरील स्पर्धा मधील विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी बक्षिसे देण्यात आली.

तसेच सदर शाळेमध्ये प्रशांत लोखंडे या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली सर्वधर्म समभाव या विषयाला अनुसरून एक पथनाट्य घेऊन त्याद्वारे एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

या सर्व कार्यक्रमास शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. उपक्रम अंतर्गत पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे हद्दीतील प्रमुख धर्मातील धर्मगुरू व प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्र बोलावून व्याख्यानाचा तसेच पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, पोलीस उपनिरीक्षक यामावार, सत्यजित भन्तेजी, मतयश स्वामी, मौलाना बाशीद व पोलीस अंमलदार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Related posts

अल्प पावसावर पेरण्या; शेतकऱ्यांचे बियाणे ‘मातीत’!

Gajanan Jogdand

खरमुरे विकण्याच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह, हिंगोलीतील 25 वर्षीय तरुणाचा संघर्षमय प्रवास

Santosh Awchar

26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलची राज्यस्तरीय बैठक

Santosh Awchar

Leave a Comment